शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले अवघे काही दिवस, राम मंदिराचं बांधकाम किती झालं? पाहा लेटेस्ट फोटो..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 5:46 PM

1 / 9
अयोध्या : रामनगरी अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू आहे. अयोध्येत २२ जानेवारी २०२४ ला भव्य राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
2 / 9
दरम्यान, राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. येथील कोरीव काम आणि अप्रतिम वास्तुकलेने लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. आता भव्य राम मंदिराच्या बांधकामाचे नवीन फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये मंदिराच्या मंडपाचे काम पूर्ण झाल्याचे दिसून येते.
3 / 9
२२ जानेवारी हा अयोध्येत उत्सवाचा दिवस असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय देशाच्या कानाकोपऱ्यातून निमंत्रित सेलिब्रिटी येणार आहेत. हे मंदिर नगर शैलीत बांधले जात आहे. मंदिराचा सिंह दरवाजा तयार आहे.
4 / 9
मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राजस्थानच्या बन्सी हिल्समधील कोरीव दगडांचा वापर केला जात आहे. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी जवळपास ८००० लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
5 / 9
प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात एका उत्साहासारखा साजरा होणार आहे. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी राम मंदिर ट्रस्टसोबतच अनेक सेवा संस्थाकडून विशेष तयारी करण्यात येत आहे.
6 / 9
राम मंदिराभोवती रिटेनिंग वॉल व्यतिरिक्त परकोटा तयार केला जात आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी मंदिराचे अंतिम काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. याशिवाय प्रभू रामाच्या तीन मूर्तींच्या उभारणीचे कामही पूर्ण झाले आहे.
7 / 9
राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, मंदिर उभारणीच्या पहिल्या टप्प्याचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. २२ जानेवारी रोजी सर्वसामान्य भाविकांना मंदिरात जाता येणार नाही. २३ जानेवारीपासून भाविकांना मंदिरात जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.
8 / 9
दरम्यान, मंदिर उभारणीची प्रगती पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक अयोध्येत पोहोचत आहेत. राम मंदिर ट्रस्टही मंदिराचे वेळोवेळी फोटो प्रसिद्ध करत आहे. रामललाच्या गर्भगृहाचे कामही पूर्ण झाले आहे.
9 / 9
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर जवळपास १६१ खांब तयार करण्यात आले आहेत. या खांबांवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश