शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Shastra Tips: घरात ठेवलेल्या या मूर्ती तुम्हाला करू शकतात मालामाल, होईल चौफेर प्रगती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 1:39 PM

1 / 6
बहुतांश घरांमध्ये सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती ठेवल्या जातात. यामधील काही मूर्ती ह्या देवीदेवतांच्या असतात. तर काही मूर्ती ह्या प्राण्यांच्या असतात. वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या मूर्ती घरात ठेवल्यास त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात की, घरामध्ये कुठल्या मूर्ती ठेवणे हे शुभ ठरू शकते.
2 / 6
वास्तूशास्त्रानुसार घरामध्ये पितळेच्या गाईची मूर्ती ठेवल्यास संततीसुख प्राप्त होते. तसेच घरातून नकारात्मक उर्जा ही दूर होते.
3 / 6
वास्तूशास्त्रानुसार गेस्टरूममध्ये हंसाची जोडी असलेली मूर्ती ठेवणं हे शुभ असते. असे केल्याने आर्थिक लाभ होतात. त्याशिवाय घरामध्ये बदकाच्या जोडीची मूर्ती ठेवली तर दाम्पत्यजीवन सुखी आनंदी राहते.
4 / 6
वास्तूशास्त्रानुसार उत्तर दिशेला पोपटाची मूर्ती ठेवली तर घरामध्ये सुख शांती कायम राहते. तसेच वैवाहित जीवनामध्येही आनंद कायम राहतो. त्याशिवाय सौभाग्यातही वृद्धी होते.
5 / 6
धार्मिक मान्यतेनुसार कासव हा विष्णूचा अवतार मानला जातो. तसेच जिथे कासव असतं तिथे माला लक्ष्मीचं वास्तव्य असतं अशी श्रद्धा असते. वास्तुशास्त्रानुसार कासवाला घराच्या पूर्वेला किंवा उत्तर दिशेला ठेवलं पाहिजे. त्याशिवाय ड्रॉईंग रुममध्ये धातूचा कासव ठेवल्याने धनवृद्धी होते.
6 / 6
वास्तू शास्त्रानुसार मासा हा धन आणि ऊर्जेचं प्रतीक आहे. घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पितळ किंवा चांदीचा मासा ठेवल्याने घरात शांततेचा वास राहतो. तसेच धनवृद्धीही होते.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रHomeसुंदर गृहनियोजन