1 / 13WWE क्रीडा विश्वासाठी बुधवारचा दिवस हा शोककळा पसरवणारा ठरला. WWE सुपर स्टार दी रॉक, ट्रीपल एच यांच्यासह अनेकांना सहकारी गमावल्याचा धक्का सहन करावा लागला.2 / 13WWE तील कुस्तीपटू शॅड गॅस्पर्ड हा काही दिवसांपासून समुद्रात बेपत्ता होता आणि 39 वर्षीय खेळाडूची बॉडी बुधवारी लॉस एंजलिस येथे सापडली. पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.3 / 13कॅलिफोर्निया येथील वेनिस समुद्रचौपाटीवर शॅड त्याच्या 10 वर्षांच्या मुलासह स्विमिंग करत होता. त्यावेळी अचानक मोठी लाट आली आणि दोघंही बुडू लागले.4 / 13यावेळी शॅडनं लाईफगार्ड रक्षकांना त्याच्या मुलाला आधी वाचवण्याच्या सूचना केल्या. त्या दरम्यान शॅड हा समुद्रात कुठे नाहीसा झाला. त्याला शोधण्यासाठी पथक कार्यरत होतं, परंतु बुधवारी लॉस एंजलिस येथे त्याचे शव सापडले.5 / 13अधिकाऱ्यांनी सांगितले की,''लॉस एंजलिस येथे आम्हाला एका आफ्रिकन-अमेरिकन पुरुषाचे शव सापडले. त्याची उंची सहा फुट सहा इंज असेल आणि वजन 240 किलो असेल. रविवारी आमच्याकडे आलेला बेपत्ता WWEच्या वर्णनानुसार हे शव त्याचेच असल्याची शक्यता अधिक आहे.'' 6 / 13शॅडच्या मुलाला लाईफगार्डने वाचवले आणि त्याची प्रकृती तंदुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. लाईफगार्ड शॅडला वाचवण्यासाठी जातील तोपर्यंत तो लाटांमध्ये गायब झाला होता. मागील तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता.7 / 13ही घटना घडली तेव्हा तो समुद्रकिनाऱ्यापासून 46 मीटर लांब होता, तो जवळ असता तर कदाचित त्याला वाचवले जाऊ शकले असते.8 / 13शॅड हा WWE मुळे प्रसिद्ध झाला होता. तो एक किक बॉक्सरही होता. WWEमध्ये तो क्राइम टाईम आणि जेटीजी यांच्यासोबत टॅग टीममध्ये खेळायचा. 9 / 132010मध्ये त्यानं निवृत्ती घेतली होती आणि त्यानंतर तो टीव्ही आणि चित्रपटांत छोट्या भूमिका करत होता.10 / 13शॅडच्या निधनानंतर WWEचे मुख्य कार्यकारी अधिकारी विंस मॅकमॅहोन यांनी ट्विट करून श्रंद्धांजली वाहिली. त्यांनी लिहिले की, या कठीण काळात आम्ही सर्व शॅडच्या कुटुंबीयांसोबत आहोत.11 / 13दी रॉक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ड्वेन जॉनसन यानेही ट्विट केले की, शॅडच्या कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत. तो एक चांगला व्यक्ती होता.12 / 13एमवीपीनं स्वतःला शॅडचा लहान भाऊ असल्याचे सांगितले. तो म्हणाला, शॅड मोठ्या मनाचा होता. त्याच्या चेहऱ्यावर मी नेहमी आनंद पाहीला होता. त्याच्यासोबतच्या अनेक चांगल्या आठवणी सोबत आहेत.13 / 13केव्हिननं लिहिलं की, शॅडच्या जाण्यानं धक्का बसला