WWE मधील 'बूगीमॅन', जो लाईव्ह सामन्यात खायचा किडे! चक्रावून टाकेल सत्य; खऱ्या आयुष्यात दिसतो स्मार्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 09:58 IST
1 / 8WWE मध्ये असाच एक कॅरेक्टर होता ... बूगीमॅन... हा खेळाडू लाईव्ह सामन्यात किडे खायचा... पाहताना ते खूपच किळसवाणे दिसायचे, परंतु त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती आणि प्रतिस्पर्धीही त्याच्या या सवईने घाबरायचे2 / 8WWE मधील बुगीमॅन खरंच किडे खायचा की तो एक स्टंट असायचा? याबाबत जी माहिती समोर आलीय ती तुम्हाला आश्चर्यचकित करेल.3 / 8WWE मधील बुगीमॅनचं खरं नाव मार्टिन राईट्स आहे... अमेरिकेच्या या कुस्तीपटूचा जन्म १५ जुलै १९६४ साली झाला होता. तो आता WWE च्या लीजेंट्स काँट्रॅक्टचा हिस्सा आहे...4 / 8मार्टिन राईटने पहिल्यांदा २००४ मध्ये WWE मध्ये सहभाग घेतला. सुरुवातीला तो एका लहान इव्हेंट्सचाच हिस्सा होता. पण, पहिल्याच मॅचमध्ये तो वादात अडकला...5 / 8मार्टीन राईट्सने त्याचं वय सांगण्यात गडबड केली होती. तो ४०व्या वर्षी त्याची पहिली फाईट खेळला, परंतु त्यानं त्याचं वय ३० वर्ष असल्याचे सांगितले होते. 6 / 8बुगीमॅनला त्याचा लूक हा युनिक बनवायचा.. त्याचा लूक फारच घाबरवणारा होता आणि या दरम्यान तो सामन्यात किंवा रिंगमध्ये एन्ट्री घेताना किडे खायचा...7 / 8तर हो... आपल्या कॅरेक्टरला अधिक सक्षम बनवण्यासाठी तो किडे खायचा.. एका मुलाखतीत त्याने याबाबत सांगितले होते की,''मी बरेच किडे खाल्ले, परंतु WWEने मला केवळ Worm ( गांडुळ) पर्यंत मर्यादित राहण्यास सांगितले होते.'' 8 / 8WWE सोडल्यानंतर तो इंस्ट्रक्टर म्हणून काम करत राहिला आणि तो WWE च्या अनेक शोमध्ये व चित्रपटांतही झळकला.