WWE Superstar 'Undertaker' retires; Do you know his real name?
WWE सुपरस्टार 'अंडरटेकर' निवृत्त; त्याचं खरं नाव तुम्हाला माहित्येय? By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 10:59 AM1 / 13WWE मधील सुपरस्टार अंडरटेकर यानं सोमवारी निवृत्ती जाहीर केली. पुन्हा रिंगमध्ये परतण्याचा कोणताही विचार नसल्याचे अंडरटेकरनं स्पष्ट केले. WWEनंही या वृत्ताला दुजोरा दिला.2 / 13WWEचा सर्वात प्रामाणिक कर्मचारी म्हणून अंडरटेकर ओळखला जातो. 1990मध्ये त्यानं WWEशी करार केला आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं पदार्पण केलं.3 / 1355 वर्षीय अंडरटेकर तेव्हाचा सर्वात आघाडीचा कुस्तीपटू होता आणि त्यानं कारकिर्दीत अनेक जेतेपद जिंकली. 4 / 13त्याच्या नावावर 7 जागतिक जेतेपदं. सहा टॅग टीम चॅम्पियन्स जेतेपदं आहेत. शिवाय त्यानं 2007मध्ये रॉयल रंम्बल आणि 12 वेळा स्लॅमी पुरस्कार जिंकला आहे.5 / 13''निवृत्तीची हिच योग्य वेळ असल्याचे मला वाटतं. आता मोटरसायकलवर राईट करून भटकंती करायची आहे. WWEसोबत अनेक भावनिक आठवणी जोडल्या गेल्या आहेत,''असे अंडरटेकर म्हणाला. 6 / 13Wrestlemaniaमधील यशस्वी खेळाडूंमध्ये अंडरटेकरचं नाव येतं. त्यानं सलग 21 Wrestlemania सामने जिंकले आहेत. त्याची ही विजयाची मालिका ब्रॉक लेसनरनं खंडीत केली. 7 / 13त्यानंतर त्यानं पाच Wrestlemania सामन्यांत सहभाग घेतला. पण, त्याला रोमन रैगन्सकडून हार मानावी लागली. 2018च्या Wrestlemaniaसामन्यात त्यानं अवघ्या तीन मिनिटांत जॉन सीनाला चीतपट केलं.8 / 13दी डेडमॅन, दी अंडरटेकर आदी नावानं तो प्रसिद्घ होता. मार्क विलियम कॅलवे असे त्याचं खरं नाव आहे. 9 / 13अंडरटेकरबाबत अनेक दंतकथा रंगवून सांगण्यात यायच्या आणि तेव्हा त्या लोकांना खऱ्याही वाटल्या होत्या.10 / 13अंडरटेकरबाबत अनेक दंतकथा रंगवून सांगण्यात यायच्या आणि तेव्हा त्या लोकांना खऱ्याही वाटल्या होत्या.11 / 13अंडरटेकरबाबत अनेक दंतकथा रंगवून सांगण्यात यायच्या आणि तेव्हा त्या लोकांना खऱ्याही वाटल्या होत्या.12 / 13अंडरटेकरबाबत अनेक दंतकथा रंगवून सांगण्यात यायच्या आणि तेव्हा त्या लोकांना खऱ्याही वाटल्या होत्या.13 / 13अंडरटेकरबाबत अनेक दंतकथा रंगवून सांगण्यात यायच्या आणि तेव्हा त्या लोकांना खऱ्याही वाटल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications