WWE superstars who championed other sports
WWE सुपर स्टार्सची अजब कहाणी; कोण होतास तू काय झालास तू !! By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 1:56 PM1 / 8WWE म्हटलं की आपल्यासमोर उभे राहते ते फुल्ल ऑफ ॲक्शनचे चित्र... एकमेकांना हरवण्यासाठी खेळाडूंची धडपड, मारामारी, आदळआपट आणि बरेच काही. हा खेळ जितका जीवघेणा आहे, तितकाच त्यातून पैसा व प्रसिद्धीही आहे. ही पैसा व प्रसिद्धी पाहूनच अनेक जण आपले प्रोफेशन सोडून WWE मध्ये आलेत आणि येथे सुपरस्टार झाले. चला मग जाणून घेऊया अशाच काही सुपरस्टार्सची अजब कहाणी... 2 / 8बील गोल्डबर्ग... WCW ( World Championship Wrestling ) मधील सर्वाधिक वर्चस्व गाजवलेला खेळाडू. पण पेशाने कुस्तीपटू असलेल्या गोल्डबर्गला WWE ने भुरळ घातली आणि तो WWE च्या रिंगमध्ये उतरला. तेथे त्याने World Heavyweight Champion and the Universal Champion हे किताब पटकावले. 3 / 8कर्ट ॲंगलचा चाहताव जगभरात आहे. WWE मध्ये पदार्पण करण्यापूर्वी तो फ्रीस्टाइल कुस्तीपटू होता. १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले आहे. 4 / 8ब्रॉक लेसनर... WWE मधील दानवच... कुस्ती, ॲथलेटिक्स, मिक्स मार्शल आर्ट्स या खेळात नशीब आजमावल्यानंतर तो WWE कडे वळला. तो UFC Heavyweight Champion आहे आणि WWE मध्ये सध्याचा Universal Champion आहे. 5 / 8टीम विएस... हॉफेनहेम संघाचा फुटबॉलपटू.. २०१० च्या वर्ल्ड कप स्पर्धेत तो जर्मनीच्या राष्ट्रीय संघाचा सदस्य होता, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. २०१४ मध्ये त्याने WWE त पदार्पण केले.6 / 8स्टुअर्ट टॉम्लिंसन... पेशाने फुटबॉलपटू असलेल्या या खेळाडूने 2004 साली स्टॅफोर्ड रेंजर्स क्लबचे प्रतिनिधित्व केले. पण, सततच्या दुखापतींमुळे त्याला सातत्य राखता आले नाही. 7 / 8सेसारो... किंग ऑफ स्विंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या हा खेळाडू पेशाने फुटबॉलपट होता. 8 / 8रोंडा रौसी... मिक्स मार्शल आर्ट्समधील प्रसिद्ध चेहेरा. त्यानंतर तिने कुस्ती व अभिनयात नशीब आजमावले. bantamweight championचा किताब जिंकूनती प्रसिद्धीझोतात आली. गतवर्षी तिने WWE मध्ये पदार्पण केले आणि ती सध्या RAW Women’s Champion आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications