कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतक-यांची केली विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 00:06 IST
1 / 4यवतमाळ : किटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या शेतक-याच्या कुटुंबाला कृषी व फलोत्पादन आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी भेट दिली. 2 / 4 सदाभाऊ खोत यांनी मृतक दीपक मडावी यांचे वडील श्याम मडावी, दीपकची पत्नी आणि मुलगी वैष्णवीचे सांत्वन केले.3 / 4तसेच, सदाभाऊ खोत यांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट देऊन भरती असलेल्या विषबाधीत शेतक-यांची विचारपूस केली. 4 / 4याचबरोबर, सदाभाऊ खोत यांनी दीपक मडावी ज्या शेतावर फवारणी करण्यासाठी गेले होते त्या शेतावर भेट दिली. तसेच, लोणबेहळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रावर भेट देऊन पाहणी केली.