बीट कॉईन संदर्भात आणखी १० तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:10 AM2018-04-07T03:10:35+5:302018-04-07T03:10:35+5:30
बीट कॉईन या आभासी चलनासंदर्भात सायबर सेलकडे शुक्रवारी आणखी दहा गुन्हे दाखल झाले आहेत. या दहा जणांची सुमारे ६० लाखाची फसवणुक झाली आहे. पुढील काही दिवसात तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पुणे - बीट कॉईन या आभासी चलनासंदर्भात सायबर सेलकडे शुक्रवारी आणखी दहा गुन्हे दाखल झाले आहेत. या दहा जणांची सुमारे ६० लाखाची फसवणुक झाली आहे. पुढील काही दिवसात तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी आवाहन केल्यावर तक्रारदार पुढे येत असून आत्तापर्यंत ३५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बिट कॉईनच्या माध्यमातून फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार अमित महेंद्रकुमार भारव्दार व त्याचा भाऊ विवेक (रा. नवी दिल्ली) या दोघांना गुरुवारी आर्थिक व सायबर शाखेच्या पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या कुटूंबातील सात जण मुख्य सूत्रधार आहेत. उद्योजक, व्यापारी, श्रीमंत व्यक्ती तसेच जादा परतावा मिळण्याच्या शोधात असणाऱ्यांना आरोपींनी आपल्या जाळ्यात अडकवले होते. तसेच एक गुंतवणूकदार आणल्यास १०० ते १००० डॉलर बक्षिसाचे आमिष दाखवले होते. गेल्या दोन दिवसांपासून या घोटाळ्याचा पदार्पाश झाल्याचे माध्यमांमधून समोर आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सायबर शाखेकडे तक्रार देण्यासंदर्भात चौकशी सुरू झाली आहे. बिटकॉईन प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचलनालयाकडे (ईडी) सोपविल्याची चर्चा आहे. मात्र त्याविषयी माहिती मिळाली नसल्याचे सायबर शाखेच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले.