महामेट्रोला देणार १० जागा, महापालिका सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव, जागा हस्तांतरणासाठी अधिका-यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 03:37 AM2018-01-10T03:37:44+5:302018-01-10T03:38:02+5:30
शहरात दापोडी ते पिंपरी या साडेसात किलोमीटरवर काम सुरू आहे. महापालिकेच्या ताब्यातील मुख्यलयाच्या प्रवेशद्वाराजवळील, संत तुकारामनगर, नाशिक फाटा उड्डाण पूल, पालिका भवनासमोरील वाहनतळाची, त्याच्या बाजूची, मोरवाडी चौकातील आणि फुगेवाडी जकात नाका या जागांची प्रामुख्याने पुणे महामेट्रोला आवश्यकता आहे.
पिंपरी : शहरात दापोडी ते पिंपरी या साडेसात किलोमीटरवर काम सुरू आहे. महापालिकेच्या ताब्यातील मुख्यलयाच्या प्रवेशद्वाराजवळील, संत तुकारामनगर, नाशिक फाटा उड्डाण पूल, पालिका भवनासमोरील वाहनतळाची, त्याच्या बाजूची, मोरवाडी चौकातील आणि फुगेवाडी जकात नाका या जागांची प्रामुख्याने पुणे महामेट्रोला आवश्यकता आहे. जागा हस्तांतरणासंदर्भात बैठक झाली. महापालिका प्रशासनाने जागा देण्यास सकारात्मता दर्शविली आहे.
महापालिका भवनातील आयुक्त दालनात झालेल्या या बैठकीला आयुक्त श्रावण हर्डीकर, महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथ सुब्रमण्यम, निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश कदम, पालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर, भूमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे उपस्थित होते.
शहरात दापोडी ते पिंपरीदरम्यान काम सुरू आहे. महामेट्रोला यासाठी पालिकेच्या जागेची आवश्यकता आहे. दहा ठिकाणच्या जागेची मागणी पुणे महामेट्रोने पालिकेकडे केली आहे. पिंपरी पालिका प्रवेशद्वाराजवळील, भवनासमोरील वाहनतळाची, त्याच्या बाजूची, संत तुकारामनगर, नाशिक फाटा उड्डाण पूल आणि फुगेवाडी जकात नाका येथील जागेची महामेट्रोने पालिकेकडे मागणी केली आहे. अशा दहा ठिकाणाच्या जागा महामेट्रोला लागणार आहेत. या जागा महामेट्रोला देण्याची मागणी मेट्रोच्या अधिकाºयांनी पालिकेकडे केली आहे. यावर प्रशासनामध्ये चर्चा झाली. जागा देण्यास सकारात्मकता दर्शविली.
पुणे महामेट्रोने पालिकेच्या ताब्यातील विविध ठिकाणच्या जागा मागितल्या आहेत. महामेट्रोला कोणती जागा आणि किती जागा पाहिजे, याबाबत चर्चा झाली. कोणती जागा द्यायची हे निश्चित झाल्यावर महासभेसमोर प्रस्ताव आणला जाईल. महासभेची मान्यता घेऊन महामेट्रोला जागा दिली जाणार आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त
महामेट्रोने मागितलेल्या पिंपरी-चिंचवडमधील जागा
ठिकाण क्षेत्र
महापालिका भवनासमोर १५ गुंठे
दापोडी बसस्टॉपमागे ४०७.२० चौरस मीटर
फुगेवाडी जकात नाका ७८ गुंठे
महापालिका भवनाच्या बाजूची जागा ७३ गुंठे
महापालिका भवन प्रवेद्वारालगत ४५२.९८ चौरस मीटर
मॅक्स न्यूरो हॉस्पिटलजवळ कासारवाडी २२४ चौरस मीटर
स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्राथमिक शाळा, फुगेवाडी ५५१.१० चौरस मीटर
तिरंगा हॉटेलच्या मागे १३८७ चौरस मीटर
जिंजर हॉटेलच्या बाजूस २२९७ चौरस मीटर
वल्लभनगर एसटी डेपोसमोर ६ गुंठे