Pune | चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्यावेळचे आंदोलन महागात, शंभरावर आंदोलकांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 09:53 PM2022-12-12T21:53:32+5:302022-12-12T21:56:49+5:30

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात शंभरापेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल...

100 protestors have been charged during the visit of Chandrakant Patil pune crime | Pune | चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्यावेळचे आंदोलन महागात, शंभरावर आंदोलकांवर गुन्हे दाखल

Pune | चंद्रकांत पाटलांच्या दौऱ्यावेळचे आंदोलन महागात, शंभरावर आंदोलकांवर गुन्हे दाखल

googlenewsNext

पिंपरी : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी (दि. १०) चिंचवड येथे दौरा झाला. यावेळी काही जणांनी आंदोलन केले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात शंभरापेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल केले.

पहिल्या प्रकरणात मारोती भापकर, संतोष निसर्गंध, नीलेश निकाळजे, माऊली बोराडे, शिवशंकर उबाळे, सूर्यकांत अर्जून सरवदे तसेच अधिक ५० ते ६० लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मारोती भापकर आणि इतर ५० ते ७० लोक यांनी शनिवारी (दि. १०) सायंकाळी चिंचवड पोलीस ठाण्यासमोर बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केली.

दुसऱ्या प्रकरणात अनिल लंकाप्पा जाधव, भूषण रानभरे, अभिजित हळदेकर, अविनाशजी सोळुंखे, वसीम इनामदार, सोहेल लांडगे, रवी म्हेत्रे, प्रसन्न मोरे, अजिंक्य हळदेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ताफा शनिवारी सायंकाळी महावीर चौक, चिंचवड येथून जात असताना अनिल जाधव आणि इतरांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली.

तिसऱ्या प्रकरणात सचिन सुरेश भोसले (रा. थेरगाव), हरिष बाळकृष्ण नखाते (रा. काळेवाडी), गणेश विजय आहेर (रा. रहाटणी), कुदरत जबीउल्ला खान (रा. वेताळनगर, चिंचवड), धनू मुरलीधर आल्हाट (रा. मोशी), नीलेश रामदास मुटके (रा. इंद्रायणीनगर, भोसरी), सुधाकर नारायण नलवाडे (रा. काळेवाडी), प्रदीप निवृत्ती साळुंखे (रा. शाहूनगर, चिंचवड), सचिन प्रभाकर साने, अमोल आनंदराव निकम, पांडुरंग दिनकार पाटील (रा. शाहूनगर), अमित श्रीराम शिंदे (रा. निगडी), दिलीप साहेबराव भोंडवे (रा. बिजलीनगर, चिंचवड), प्रवीण धांडेप्पा पाटील (रा. म्हेत्रेवस्ती, चिखली), चेतल गंगाधर वाघमारे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), युवराज सूर्यभान कोकाटे (रा. अजंठानगर, चिंचोली), शिवाजी नागू कुराडकर (रा. कासारवाडी), किशोर आबा सवाई (रा. दिघी), संतोष धनाजी वाळके (रा. आळंदी रोड, दिघी), किरण ज्ञानेश्वर दळवी (रा. चिंचवडगाव), ओंकार यशवंत विनोदे (रा. विनोदेनगर, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी सायंकाळी साडेपाचला चिंचवड येथे जिजाऊ गार्डनसमोर सचिन भोसले आणि इतरांनी बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केली.

घोषणाबाजी करून आंदोलन केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत कायदेशीर प्रक्रिया व कारवाई करण्यात येईल.

- अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Web Title: 100 protestors have been charged during the visit of Chandrakant Patil pune crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.