मार्चअखेर १२०० कोटी एलबीटी जमा

By admin | Published: March 21, 2017 05:20 AM2017-03-21T05:20:25+5:302017-03-21T05:20:25+5:30

आर्थिक वर्षाच्या अखेरीस महापालिकेतील एलबीटी उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे.

1200 crores LBT deposits by the end of March | मार्चअखेर १२०० कोटी एलबीटी जमा

मार्चअखेर १२०० कोटी एलबीटी जमा

Next

पिंपरी : आर्थिक वर्षाच्या अखेरीस महापालिकेतील एलबीटी उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. आजअखेर महापालिकेकडे एक हजार २२८ कोटी रुपये जमा झाले आहेत. अनुदान आणि मुद्रांक शुल्क यामुळे एलबीटीचे १३०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण होईल.
राज्य सरकारने १ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापारी, उद्योगांकडून एलबीटी वसुली कायम राहील, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार शहरात ६८१ व्यापारी आणि उद्योजकांची आर्थिक उलाढाल ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांच्याकडून महापालिकेला सरासरी १२० कोटींचे उत्पन्न एलबीटीच्या माध्यमातून मिळते. याशिवाय दारूउत्पादक कंपन्यांनाही एलबीटी लागू असल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात सुमारे १४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
एलबीटी विभागाने २०१५-१६ मध्ये १३०८ कोटी ५८ कोटींची वसुली केली. त्यामुळे २०१६-१७ मध्ये महापालिकेला एक हजार ३५० कोटींचे उद्दिष्ट दिले. (प्रतिनिधी)

Web Title: 1200 crores LBT deposits by the end of March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.