जीएसटीतून मिळाले १२९ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:35 AM2017-08-05T03:35:13+5:302017-08-05T03:35:13+5:30
जीएसटी लागू झाल्यानंतर दुसºयाच महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेला जीएसटीपोटी आॅगस्ट महिन्याचे १२८ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. जुलै महिन्यामध्येही महापालिकेला १२९ कोटी रुपये अनुदान मिळाले होते.
पिंपरी : जीएसटी लागू झाल्यानंतर दुसºयाच महिन्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेला जीएसटीपोटी आॅगस्ट महिन्याचे १२८ कोटी ९७ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. जुलै महिन्यामध्येही महापालिकेला १२९ कोटी रुपये अनुदान मिळाले होते. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत अनुदान देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी दुसºया महिन्यातही वेळेवर झाली आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार १ जुलैपासून देशात वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे यापूर्वी वसूल करण्यात येणारा प्रवेशकर, स्थानिक संस्था कर, जकात, उपकर किंवा इतर सर्व कर बंद करण्यात आले आहेत. त्यापोटी दर महिन्याला राज्य सरकारकडून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत अनुदान देणे बंधनकारक आहे. जुलैमध्ये
पहिल्याच महिन्यात महापालिकेला जीएसटी पोटी १२८ कोटी रुपये अनुदान मिळाले होते.
जीएसटी पोटी राज्यातील २६ महापालिकांना १४०४ कोटी अनुदान मंजूर झाले आहे. जकात बंद झाल्यानंतर एलबीटीचे अनुदान वेळत मिळत नव्हते. त्याचा आकडाही निश्चित नव्हता. यामुळे राज्यातील महापालिकांना कर्मचाºयांच्या वेतनाची चिंता लागली होती. वेतनाची तारीखसुद्धा निश्चित नव्हती. वेतन व खर्चासाठी सरकारच्या अनुदानाची वाट पाहवी लागत होती. जीएसटीचे अनुदान वेळेवर मिळत असल्याने महापालिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.