Bitcoin मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने पिंपरी-चिंचवडमध्ये १४ लाखांचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 04:41 PM2022-08-16T16:41:18+5:302022-08-16T16:42:34+5:30
अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल....
पिंपरी : बिटकॉॅईनमध्ये गुंतवणुक करून नफा मिळवून देण्याच्या अमिषाने तब्बल १३ लाख ६७ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. ही घटना ८ एप्रिल ते ३ मे या कालावधीत यमुनानगर, निगडी येथे घडली. या प्रकरणी राकेश ईश्वरदास लोहार (वय ३८, यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.१५) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना वेगवेगळ्या तीन मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत बिटकॉॅईनमध्ये गुंतवणुक करण्याचे अमिष दाखविण्यात आले. बिटकॉॅईनमध्ये नफा मिळेल, असे सांगत आरोपीने फिर्यादी यांना व्हॉट्सअपवर एक लिंक पाठवली.
या लिंकद्वारे फिर्यादीने आपली सर्व माहिती भरत बायकॉॅईन हे ॲप डाऊनलोड केले. या ॲपद्वारे फिर्यादींनी तब्बल १३ लाख ६७ हजार रुपये भरले. मात्र, त्याना कोणताच परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.