रेल्वेला जलवाहिनीसाठी पालिकेकडून १४ लाख
By admin | Published: May 4, 2017 02:42 AM2017-05-04T02:42:21+5:302017-05-04T02:42:21+5:30
महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पेठ क्रमांक २६ येथे जलवाहिनी रेल्वे क्रॉसिंग करून पलीकडे न्यावी
पिंपरी : महापालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पेठ क्रमांक २६ येथे जलवाहिनी रेल्वे क्रॉसिंग करून पलीकडे न्यावी लागणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाला मार्ग आणि विभागीय शुल्कापोटी १४ लाख ३५ हजार रुपये द्यावे लागणार आहेत. हा विषय मंजूर करण्यात आला.
केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत शहराच्या ४० टक्के भागात चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. या कामाअंतर्गत पेठ क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र ते डांगे चौक या दरम्यान, एक हजार मिमी व्यासाची पाण्याची वाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम प्रगतिपथावर असून, पेठ क्र. २६ येथील पीसीसीओई कॉलेज येथे ही वाहिनी रेल्वे क्रॉसिंग करून पलीकडे नेणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाने मार्ग रजा आणि विभागीय शुल्कापोटी १४ लाख ३५ हजार ८५० रुपये इतकी रक्कम १० मे २०१७ पूर्वी देण्याबाबत कळविले आहे. (प्रतिनिधी)
१४ लाखांची रक्कम १० मेपर्यंत देणे शक्य नसल्याने त्यासाठी काही दिवसांची मुदतवाढ मिळण्याबाबत रेल्वे प्रशासनाला २९ एप्रिल २०१७ रोजी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. याशिवाय संबंधित अधिकाऱ्यांना समक्ष भेटून कल्पना दिली आहे. १४ लाख ३५ हजार रुपये रक्कम रेल्वेकडे देणे आवश्यक असल्याने हा विषय मंजूर केला.