पवना धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:56 PM2018-08-04T19:56:31+5:302018-08-04T19:57:18+5:30
मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्या पवन मावळातील पवना धरणात 99 टक्के पाणीसाठा झाल्याने या धरणातून आज सकाळी 9 वाजल्यापासून हायड्रो करिता 1400 क्युसेकने पाणी सोडण्यात आले.
लोणावळा : मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणार्या पवन मावळातील पवना धरणात 99 टक्के पाणीसाठा झाल्याने या धरणातून आज सकाळी 9 वाजल्यापासून हायड्रो करिता 1400 क्युसेकने पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पवना धरणाचे शाखा अभियंता अे. एम. गडवाल यांनी दिली. धरण परिसरात आज दिवसभरात 17 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जुन महिन्यात मावळ तालुक्यात हजेरी लावून पसार झालेल्या पावसाने जुलै महिन्यात मात्र सर्व कसूर भरुन काढत जोरदार सरी बरसवल्या. पवना धरण परिसरात आज अखेर 2169 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर पवना धरण परिसरात वाढल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. मागील आठवडा भरापासून विसावलेल्या पावसाने शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा जोर धरला आहे. आज दिवसभर लोणावळा परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.