कामगाराला बोलण्यात गुंतवून दुकानातून १४ हजारांची रोकड पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 06:47 PM2021-07-06T18:47:47+5:302021-07-06T18:47:53+5:30
पिंपरीच्या हिंजवडीतील घटना, तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : दुकान बंद करत असताना कामगाराला एका अनोळखी व्यक्तीने बोलण्यात गुंतवले. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी दुकानातून १४ हजारांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास सुसगाव येथे घडली.
कालिदास वसंत करचे (वय ३३, रा. नांदे, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करचे यांचे सुसगावमध्ये एचपी पेट्रोल पंपासमोर कृष्णा पेंट्स नावाचे हार्डवेअर व पेंटिंग सामानाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातील कामगार जितेंद्र जोगिंदर सिंग हा सोमवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास दुकान बंद करत होता. त्यावेळी एक अनोळखी माणसाने कामगाराला बाहेर बोलावले. त्या इसमाने कामगाराला त्याच्यासोबत बोलण्यात गुंतवले. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी करचे यांच्या दुकानात उघड्या दरवाजातून प्रवेश केला. दुकानाच्या ड्रॉवर मधील १४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.