सहा महिन्यांत १५ लाखांची वीजचोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:05 AM2019-03-20T02:05:29+5:302019-03-20T02:05:44+5:30
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची मागील सहा महिन्यांत १५ लाख ६३ हजार ९३० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची मागील सहा महिन्यांत १५ लाख ६३ हजार ९३० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश लक्ष्मण झगडे, योगेश चंद्रकांत झगडे, हृषिकेश चंद्रकांत झगडे (सर्व रा. स्वप्ननगरी, झगडेवस्ती, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्ये (वय ४९, रा. एमआयटी कॉलेज रोड, रामबाग, कोथरुड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
६५ हजार युनिटची चोरी
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपींनी २४ जुलै २०१८ ते २५ जानेवारी २०१९ या सहा महिन्यांत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची वीजचोरी केली. ६५ हजार ३१० युनिटची १५ लाख ६३ हजार ९३० रुपयांची वीजचोरी केल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात आरोपींवर भारतीय विद्युत कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.