विक्रीसाठी घेवून जात असलेला दीडशे किलो गांजा पकडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:51 PM2019-05-02T15:51:06+5:302019-05-02T15:52:13+5:30
विक्रीसाठी घेवून जात असलेला ३५ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा १५० किलो गांजा गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला. ही कारवाई बाणेर येथे पुणे-मुंबई महामार्गावर केली असून दोघांना अटक केली आहे.
पिंपरी : विक्रीसाठी घेवून जात असलेला ३५ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा १५० किलो गांजा गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडला. ही कारवाई बाणेर येथे पुणे-मुंबई महामार्गावर केली असून दोघांना अटक केली आहे.
योगेश दत्तात्रय जोध (वय २८, रा. ७७, चंदननगर, जुळे सोलापूर, डी मार्ट जवळ, जि. सोलापूर), सागर दिगंबर कदम (वय २८, रा. वामननगर, जुळे सोलापूर, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाणेर येथे मुंबई-पुणे महामार्गावरील सेवा रस्त्यावर पोलीस गस्त घालत असताना काहीजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, परिसरात पाहणी केली असता पुणे-मुंबई महामार्गावरील बिटवाईज कंपनीजवळ आरोपी संशयितत्यिा आढळून आले. पोलिसांना सापळा रचून त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडील ३५ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा १५० किलो गांजा जप्त केला.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरिक्षक श्रीराम पौळ, उपनिरिक्षक वसंत मुळे, प्रशांत महाले, हवालदार राजन महाडिक, राजेंद्र बांबळे, प्रदीप शेलार, दिनकर भुजबळ, संतोष घिगे, दादा धस, प्रसाद जंगलीवाड, अशोक गारगोटे, शैलेश मगर, प्रदीप गुट्टे, अनिता यादव यांच्या पथकाने केली.