Pimpri Chinchwad | लग्नाचे अमिष दाखवून महिलेसोबत शारिरीक संबंध; १७ लाख रुपये घेऊन आरोपी पळाला
By रोशन मोरे | Updated: March 25, 2023 16:12 IST2023-03-25T16:11:09+5:302023-03-25T16:12:47+5:30
फिर्यादीची फसवणूक करून आरोपी पळून गेला...

Pimpri Chinchwad | लग्नाचे अमिष दाखवून महिलेसोबत शारिरीक संबंध; १७ लाख रुपये घेऊन आरोपी पळाला
पिंपरी : लग्नाचे अमिष दाखवून महिलेसोबत वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले. तसेच तिच्याकडून १७ लाख रुपये घेत आरोपी पळून गेला. ही घटना २०१७ ते २२ मार्च २०२३ या कालावधीत हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.२४) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विजयसिंग सुजभानसिंग तंवर (वय ३०, रा. उत्तरनगर, मुळगाव - डुंगरपूर, राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीस लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्तापित केले. तसेच आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून रोख स्वरुपात साडेबारा लाख रुपये तसेच ऑनलाईन स्वरुपात चार लाख ७७ हजार ६३० रुपये घेतले. तसेच फिर्यादीची फसवणूक करून आरोपी पळून गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.