देहू नगरपंचायतीसाठी 17 जागा निश्चित ; आठवडाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:23 PM2021-01-11T12:23:52+5:302021-01-11T12:24:39+5:30
नव्या नगरपंचायती मध्ये अनुसूचित जाती साठी तीन जागा राखीव असून दोन महिला व एक पुरुष अशा या जागा असतील.
देहूगावःदेहूगाव येथे नुकत्याच स्थापन झालेल्या देहू नगरपंचायतीची 17 सदस्य संख्या निश्चित झाली असून येत्या आठवड्याभरात निवडणूक आयोगाकडून वार्ड रचना करण्या संदर्भामध्ये कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे. देहूच्या नगरपंचायतीचे सदस्य संख्या 17 निश्चित झाल्याने कार्यकर्त्यांमधिल संभ्रम दूर झाला असुन इच्छुक उमेदवार वार्डची चाचपणी करु लागले आहेत.
नव्या नगरपंचायती मध्ये अनुसूचित जाती साठी तीन जागा राखीव असून दोन महिला व एक पुरुष अशा या जागा असतील. अनुसूचित जमाती साठी एक जागा राखीव आहे ही जागा पुरुष किंवा महिलेसाठी जाऊ शकते. नागरीकांचा इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी साठी पाच जागा राखीव आहेत. यामध्ये तीन महिला व दोन पुरुष असणार आहेत. उर्वरित आठ जागा ह्या सर्वसाधारण असणार आहेत. यामध्ये चार जागा पुरुष व चार जागा महिलांसाठी असणार आहेत. मात्र अनुसूचित जमाती ची जागा महिलांसाठी राखीव निघाल्यास सर्वसाधारण महिलांची एक जागा कमी होईल. असे 8 जानेवारीच्या शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.