कंपनीने वाहतुकीसाठी दिलेला १८ लाख ६० हजारांचा माल लंपास; वाहन चालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 01:52 PM2021-08-11T13:52:10+5:302021-08-11T13:52:40+5:30
वाहतुकीसाठी दिलेला १८ लाख ६० हजारांचा माल लंपास; वाहन चालकावर गुन्हा दाखल
पिंपरी : कंपनीने दिलेला १८ लाख ६० हजार रुपये किमतीच्या मालाची चोरी केली. याप्रकरणी वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी (दि. ६) ही घटना घडली.
नवनाथ केरनाथ चव्हाण (रा. तळेगाव दाभाडे), असे आरोपी वाहन चालकाचे नाव आहे. सुनील वसंत यादव (वय २८, रा. वर्धनगड, ता. खटाव, जि. सातारा) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १०) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपीकडे सुपरस्टार कार्गो कंपनीचा १८ लाख ६० हजार ६३ रुपये किमतीचा माल दिला. एका टेम्पोमधून तो माल पुण्याच्या दिशेने घेऊन जात असताना आरोपी टेम्पो चालकाने त्या मालाची चोरी केली. तसेच टेम्पो रस्त्यात सोडून देऊन पसार झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल साळी तपास करीत आहेत.