अवघ्या दहा तासांत १८ लाखांचा अपहार; पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकाकडून फसवणूक
By रोशन मोरे | Published: September 29, 2023 04:47 PM2023-09-29T16:47:36+5:302023-09-29T16:47:46+5:30
पोलिसांनी संशयित रचितकुमार राकेश पांडे (२७, रा.कंधेपूर, जि. सुलनापूर, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला
पिंपरी : मालकासोबत झालेल्या वादातून पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने अवघ्या दहा तासांत १८ लाखांचा अपहार केला. ही घटना रविवारी (दि.२४) दुपारी एक ते रात्री ११ या कालावधीत गावडे पेट्रोलपंप, एमआयडीसी भोसरी येथे घडली. या प्रकरणी राम सदाशिव गावडे (वय ४९, रा. आळंदी देवाची, ता.खेड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात बुधवारी (दि.२७) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित रचितकुमार राकेश पांडे (२७, रा.कंधेपूर, जि. सुलनापूर, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित रचितकुमार याला फिर्यादी राम यांनी आपल्या पेट्रोलपंपावर हिशोब ठेवण्यासाठी व्यवस्थापक म्हणून कामावर ठेवले होते. रचित कुमार याचा राम यांच्यासोबत काही कारणाने वाद झाला होता. या वादानंतर रविवारी (दि.२४) पेट्रोलपंवार झालेल्या व्यवसाय संबंधित कोणतीही माहिती दिली नाही. तसेच राम यांना १८ लाख ३० हजार ४९० रुपयांचा कोणताही हिशोब न देता पैशांचा अपहार करून तो पळून गेला. रचितकुमार हा मुळचा उत्तर प्रदेशमधील आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत.