सराईत चोराकडून १८ मोबाईल जप्त
By admin | Published: July 2, 2017 02:39 AM2017-07-02T02:39:45+5:302017-07-02T02:39:45+5:30
गर्दीच्या वेळी एस.टी स्टँंड, रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमध्ये चढणा-या प्रवाशांचे मोबाईल लंपास करणा-या सराईत मोबाईल चोराला गुन्हे शाखेच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गर्दीच्या वेळी एस.टी स्टँंड, रेल्वे स्टेशन आणि रेल्वेमध्ये चढणा-या प्रवाशांचे मोबाईल लंपास करणा-या सराईत मोबाईल चोराला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक केली. त्याच्याकडून १ लाख ५० हजार ५०० रूपये किंमतीचे १८ मोबाईल हँण्डसेटस जप्त करण्यात आले.
गणेश बाबुराव परगे ( वय १९ वर्ष रा. मु.पो घाणेशी ता. जळकोट जि.लातूर) याला अटक करण्यात आली. स्वारगेट एस.टी स्टÞँंड येथे आरोपी चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आला असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १८ मोबाईल जप्त करण्यात आले. या आरोपीविरूद्ध उदगीर पोलीस ठाणे जि.लातूर येथे एकूण ८ सायकल चोरीच्या गुन्हयात २०१३ मध्ये ताब्यात घेण्यात आले होते. युनिट ३ गुन्हे शाखेचे सीताराम मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बाबर, सहायक पोलीस निरीक्षक अशोक भोसले, स्टिव्हन सुंदरम, राजू रासगे, रोहिदास लवांडे, गुणशिंलन रंगम, अनिल घाडगे, गजानन गाणबोटे, शिवानंद स्वामी, अतुल साठे, संदीप राठोड, सुजित पवार यांनी ही कामगिरी केली.
ठाणे दिवा जंकशन येथे मोबाईल चोरीबाबत अटक करण्यात आली होती. या ११ मोबाईल हँण्डसेटबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात ६ गुन्हे, पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे ४ गुन्हे, दादर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे १ असे गुन्हे दाखल आहेत. या ठिकाणाहून कोणाचे मोबाईल हँंडसेट चोरी गेले असल्यास युनिट ३शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.