Pimpri Chinchwad: हॉटेलला रेटिंग देणे पडले १९ लाखांना; पिंपरी चिंचवडमधील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 18:40 IST2023-06-14T18:39:40+5:302023-06-14T18:40:02+5:30
महिलेची १९ लाख ३२ हजारांची फसवणूक...

Pimpri Chinchwad: हॉटेलला रेटिंग देणे पडले १९ लाखांना; पिंपरी चिंचवडमधील प्रकार
पिंपरी :हॉटेलला रेटिंग देण्याचा टास्क पूर्ण करून पैसे कमाविण्याचे महिलेला आमिष दाखवले. त्यानंतर टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने महिलेची १९ लाख ३२ हजारांची फसवणूक केली. पूर्णानगर, चिंचवड येथे १ ते ९ जून या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी महिलेने मंगळवारी (दि. १३) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, बँक खातेधारक, टेलिग्राम आयडीधारक आणि एका लिंकधारकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीशी संपर्क करून त्यांना हॉटेलला रेटिंग देण्याचा टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादीची १९ लाख ३२ हजार ८६१ रुपयांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.