तेराशे एकरचा होणार विकास, पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलमेंटसाठी २० कोटींची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:54 AM2017-10-27T01:54:02+5:302017-10-27T01:54:11+5:30
पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत तेराशे एकरचा विकास करण्यात येणार आहे.
पिंपरी : स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत तेराशे एकरचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अकरा संस्था सहभागी झाल्या असून, याविषयीची निविदापूर्व सभा आज झाली.
२०.४० कोटींची कामे करण्यात
येणार आहे. महिनाभरात निविदाप्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यानंतर एक बैठक झाली. त्यानंतर पॅन सिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंटच्या निविदा प्रक्रिया राबविणे, सल्लागार संस्था नियुक्त करण्याचा विषय मंजूर झाला होता. त्यानुसार एरिया बेस डेव्हलेपमेंटमध्ये पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकडचा काही भाग आणि कासारवाडीचा काही भाग येत आहे.
यासंदर्भांत निविदापूर्व बैठक आज झाली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख नीळकंठ पोमण आदी उपस्थित होते. या बैठकीस टाटा कन्सलटिंग इंजिनिअरिंग लिमिटेड, पीडब्ल्यूसी, केपीएमजी, एन्कॉम, सीएचटूएम, डीआयएमटीएस, आयबीआय, इजीस, फीडबॅक अशा राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय पातळीवरील संस्था उपस्थित होते.
एरिया बेस डेव्हलपमेंटमध्ये पिंपळे सौदागर,
पिंपळे गुरव, वाकडचा काही भाग आणि कासारवाडीचा १३२० एकरचा भाग येत असून, त्याचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच रोड डेव्हलपमेंट, नाला सुधार, खेळाची मैदान, हमरस्ता विकास, बीआरटीमधील बस स्टॉपनिर्मिती अशी कामे केली जाणार आहेत. तसेच कासारवाडी येथे बीआरटी, रेल्वे आणि मेट्रो अशी मल्टिमोड ट्रान्सपोर्ट सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात २०.४० कोटींची कामे करण्यात येणार आहेत. स्थापत्यविषयक कामांचे प्रमाण अधिक असून, सीओईपीचे डॉ. प्रताप रावळ यांनी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. निविदापूर्व बैठकीत केलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून पुढील महिन्यापर्यंत निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.
स्मार्ट सिटी असणारा शासनाकडील पंचवीस लाखांचा हिस्सा मिळावा, यासाठी महापालिकेने पत्रव्यवहार केला आहे. स्मार्ट सिटीचे चेअरमन डॉ. नितीन करीर यांच्या उपस्थितीत येत्या दहा नोव्हेंबरला बैठक होणार आहे, अशी माहिती माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी दिली.