बोगस खरेदी-विक्रीप्रकरणी मावळात २४ गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:29 AM2019-01-08T00:29:02+5:302019-01-08T00:29:29+5:30

लोणावळा उपविभाग : घरफोड्या, दरोड्यांत १ कोटी ५६ लाखांचा ऐवज लंपास

24 cases filed in Moghal in connection with the sale of bogus | बोगस खरेदी-विक्रीप्रकरणी मावळात २४ गुन्हे दाखल

बोगस खरेदी-विक्रीप्रकरणी मावळात २४ गुन्हे दाखल

Next

विजय सुराणा

वडगाव मावळ : लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी अंतर्गत असलेल्या वडगाव, कामशेत, लोणावळा ग्रामीण व लोणावळा शहर अशा चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत डिसेंबरअखेर १ कोटी ५६ लाख ८८ हजारांचा ऐवज चोरून नेला. पैकी ७० लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. चालू वर्षात चारही पोलीस ठाण्यांची आकडेवारी पाहता चोरी व खुनांच्या घटनांत वाढ झाली आहे.

वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन खून झाले असून, ७७ घरफोड्या, चोऱ्या झाल्या आहेत. ४१ लाखांचा ऐवज गेला आहे. पैकी २१ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात यश आले आहे. जमीन खरेदी-विक्री प्रकरणात १२ गुन्हे दाखल झाले आहेत. कामशेत पोलीस ठाण्यात २ दरोडे, ५ खून, ३६ घरफोड्यांत २८ लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. पैकी १७ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. जमिनीच्या बोगस खरेदी-विक्रीप्रकरणी दोन गुन्हे दाखल आहेत.
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५६ घरफोड्या, चोºया झाल्या असून, ४७ लाख ५२ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. पैकी ६ लाख १७ हजारांचा ऐवज हस्तगत केला. जमीन खरेदी-विक्रीप्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले. लोणावळा शहर हद्दीत ८७ घरफोड्या, चोºया झाल्या असून ३९ लाख ४६ ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. पैकी १३ लाख ८७ हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. जमीन खरेदी-विक्रीप्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत. बलात्काराचे ५ गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिसांची गस्त वाढविली : ज्ञानेश्वर शिवथरे
यंदा खुनातील आरोपी, तसेच बोगस जमीन खरेदी-विक्री प्रकरणातील आरोपी अटक करून गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोड्यांचे प्रमाण कमी होण्यासाठी पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. मनुष्यबळ कमी असूनही पोलिसांची कामगिरी चांगली आहे. त्या चांगल्या कामगिरीमुळे आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहे, अशी माहिती विभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवतरे यांनी दिली.

Web Title: 24 cases filed in Moghal in connection with the sale of bogus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.