चोरट्यांकडून २६ मोबाईल हस्तगत
By admin | Published: March 22, 2017 03:10 AM2017-03-22T03:10:43+5:302017-03-22T03:10:43+5:30
अडचणीत असल्याचे सांगत मदतीसाठी नातेवाइकांना फोन करायचा असल्याची बतावणी करीत नागरिकांचे मोबाईल लंपास
पिंपरी : अडचणीत असल्याचे सांगत मदतीसाठी नातेवाइकांना फोन करायचा असल्याची बतावणी करीत नागरिकांचे मोबाईल लंपास करणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. कात्रज-देहू रस्ता बाह्यवळण मार्गावर या तरुणाने चोऱ्या केल्या असून, त्याच्याकडून १ लाख ५ हजारांचे तब्बल २६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
अश्विन ज्ञानदेव खांडेकर (वय २५, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपी कात्रज चौकातील बसथांब्याजवळ उभा असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गणेश चिंचकर आणि प्रणव संकपाळ यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक समाधान कदम, कर्मचारी गणेश चिंचकर, उज्वल मोकाशी, प्रणंव संकपाळ, अमोल पवार आदिंनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)