कोम्बिंग ऑपरेशनमध्ये २७ जणांना ठोकल्या बेड्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 08:25 AM2022-08-24T08:25:50+5:302022-08-24T08:30:06+5:30
नाकाबंदीत ९७४ वाहनांची तपासणी...
पिंपरी : गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन रावबले. यात सराईत गुन्हेगार, तडीपार, फरार आरोपी यांच्यावर कारवाई करण्यात आली. २७ जणांना अटक केली. तसेच नाकांबदी करून ९७४ वाहनांची तपासणी केली.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मालमत्तेविरुध्दचे व शरीराविरुद्धचे संभाव्य गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोमवारी (दि. २२) रात्री १२ ते ते मंगळवारी (दि. २३) पहाटे तीन या वेळेत कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी करण्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेसह एकूण पाच सहायक पोलीस आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक, ५५ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ४९६ अंमलदार यांची पथके तयार करण्यात आली.
कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान पोलीस ठाणे व चौकी व गुन्हे शाखा यांनी रेकॉर्डवरिल ३९० आरोपीना चेक केले. सीआरपीसी १०७ प्रमाणे ०५, १०९ प्रमाणे दोन व ११० प्रमाणे एक कारवाई केली. बीपी ॲक्ट १२२ प्रमाणे चार, कारवाई तर आर्म ॲक्टप्रमाणे एक, पाहिजे आरोपी एकूण २१ अटक तर फरारी आरोपी पाच अटक केले. नाकाबंदी दरम्यान ९७४ वाहने तपासून मोटार वाहन कायद्याप्रमाणे ८१ वाहनांवर ५१ हजार ३२५ रुपयांचा दंड आकारण्यात आला. अजामीनपात्र सहा तर जामीनपात्र चार वॉरंट बजवाले.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, डॉ. काकासाहेब डोळे, आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.