मावळ लोकसभा निकालासाठी २९ फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:58 PM2019-05-14T12:58:38+5:302019-05-14T13:03:39+5:30
मावळ लोकसभा मतदारसंघाची २३ मेला मतमोजणी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाची २३ मेला मतमोजणी होणार आहे. यावेळी एकूण मतदानापैकी पाच टक्के व्हीव्हीपॅटची मते मोजायची असल्याने अंतिम निकालास रात्र होणार आहे. चिंचवड आणि पनवेल विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदान झाल्याने मतमोजणीसाठी १४ ऐवजी अधिकचे टेबल मांडण्यास मान्यता द्यावी, अशी विनंती मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाºयांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात १३ लाख ६६ हजार ८१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडी क्रीडासंकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक मनुष्यबळासह व्यवस्थेसंदर्भात नियोजन केले आहे. लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. प्रत्येकी १४ टेबलची व्यवस्था केली आहे. एकाच वेळी ८४ मतदान केंद्रांची मतमोजणी झाल्यानंतर फेरीनिहाय निकाल जाहीर होतील. मतमोजणीच्या वेळी संपूर्ण व्हीडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाला विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमोर स्ट्राँग रूम उघडण्यात येतील. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी आठला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएमच्या मोजणीला सकाळी साडेआठला सुरुवात होईल.
चिंचवडमध्ये २ लाख ८३ हजार ४ मतदारांनी, तर पनवेलमध्ये २ लाख ९८ हजार ३४९ मतदारांनी हक्क बजाविला आहे. १४ टेबलवर मतमोजणी करायची ठरविल्यास चिंचवडसाठी ३४, तर पनवेलसाठी ४२ फेºया होणार आहेत. एका फेरीला ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी गृहीत धरल्यास मावळ लोकसभेच्या निकालासाठी रात्र होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करायची आहे. मतमोजणीसाठी चिंचवडसाठी २० टेबल, तर पनवेलसाठी २४ टेबल मांडण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. आयोगाने मान्यता दिल्यास विधानसभा मतदारसंघनिहाय फेºया होतील.
....
टेबल वाढविल्यास फेºया, वेळ कमी लागणार
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणी कक्षाची रचना केली आहे. विधानसभानिहाय १४ टेबलची मांडणी केली आहे. त्यानुसार सुमारे २५ ते ४२ फेºया होणार आहेत. एका फेरीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी सुरू करू नये, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. एक फेरी पूर्ण व्हायला साधारणत: ४० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
.......
विधानसभा मतदान केंद्र्र झालेले मतदान फेºया
पनवेल ५८४ २,९८,३४९ २५
चिंचवड ४७० २,८३,००४ २४
पिंपरी ३९९ १,८९,४०४ २९
मावळ ३६९ २,११,३८३ २७
कर्जत ३४३ १,८९,५७७ २५
उरण ३३९ १,९५,१०१ २५
एकूण २,५०४ १३,६६,८१८ १५५
बघडलेल्या ईव्हीएमची शेवटी मोजणी
४मतदानानंतर इव्हीएमच्या बॅलेट युनिटचे ‘क्लोज’ बटण दाबणे आवश्यक असते. चुकीने हे बटण न दाबल्यास कोणाला किती मते गेली याचा आकडा दिसत नाही. मोजणीच्या दिवशी अशी घटना घडल्यास त्या ईव्हीएम बाजूला काढून ठेवण्यात येतील. सर्व ईव्हीएमची मोजणी झाल्यावर या ईव्हीएममधील क्लोज बटण दाबून त्यातील निकाल जाहीर केला जाणार आहे. मतदानाच्या दिवशी प्रथम मॉक पोल घेतले. मॉक पोलचा डाटा इरेज करणे आवश्यक आहे. काही मतदान केंद्रांवरील मॉक पोलचा डाटा नष्ट केला नाही. याची माहिती आयोगाला देणे बंधनकारक आहे. त्यांच्या आदेशानुसार प्रसंगी या सर्व मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटची मोजणी करून मते निश्चित होतील.