मोटार अडवून चालकाची ३० हजारांची लुबाडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:55 AM2019-03-01T01:55:21+5:302019-03-01T01:55:23+5:30
पिंपरी : मोटारीतून जाणाऱ्या दोघांना अडवून मारहाण करीत त्यांच्या मोटारीची तोडफोड केली. त्यानंतर मोटारचालकाच्या खिशातून ३० हजार रुपये जबरदस्तीने ...
पिंपरी : मोटारीतून जाणाऱ्या दोघांना अडवून मारहाण करीत त्यांच्या मोटारीची तोडफोड केली. त्यानंतर मोटारचालकाच्या खिशातून ३० हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शिवार चौकाजवळ पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत श्याम पालमपल्ले (वय २३, रा. पिंपळे सौदागर), महेश ऊर्फ राहुल लक्ष्मण सावंत (वय २३, रा. थेरगाव), नितेश लक्ष्मण लांडगे (वय २१, रा. रहाटणी रस्ता, पिंपळे सौदागर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रुपेश मोहन तापकीर (वय ३२, रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी मोहन आणि त्यांचा मित्र सूरज पवार हे दोघे जण त्यांच्या मोटारीतून जात होते. शिवार चौकाजवळ आले असता आरोपींनी त्यांना अडविले. आरोपी हे मोहन यांच्या ओळखीचे असल्याने त्यांनी मोटार थांबवली. त्या वेळी आरोपींनी मोहन आणि
सूरज यांना धमकी देत मोटारीच्या काचा फोडल्या. तसेच दोघांना मारहाण करत मोहन यांच्या खिशातून जबरदस्तीने ३० हजार रुपयांची रोख रक्कम पळवून नेली. या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक हरेश माने तपास करीत आहेत.