पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ हजार ६२२ नवे मतदार; चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 01:26 PM2024-01-30T13:26:04+5:302024-01-30T13:26:34+5:30

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांना येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे....

36 thousand 622 new voters in Pimpri-Chinchwad; Highest number of voters in Chinchwad Constituency | पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ हजार ६२२ नवे मतदार; चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या

पिंपरी-चिंचवडमध्ये ३६ हजार ६२२ नवे मतदार; चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरात लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शहरात मतदारांची संख्याही वाढत आहे. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांत एकूण ३६ हजार ६२२ मतदार वाढले आहेत. निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांना येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे.

निवडणूक आयोगाने २३ जानेवारीला महाराष्ट्र राज्यातील विधानसभानिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात पिंपरी मतदारसंघात ३ लाख ६४ हजार ८०६ मतदार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५ लाख ९५ हजार ४०८ मतदार आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण ५ लाख ३५ हजार ६६६ मतदार आहेत. शहरात एकूण ८ लाख २ हजार १६० पुरुष, ६ लाख ९३ हजार ५५९ महिला आणि १६१ तृतीयपंथी मतदार आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या एक लाख ९ हजारांनी कमी आहे.

नवमतदारांची संख्या वाढली

या मतदार यादीतून दुबार नावे, मृत, समान छायाचित्र असलेली नावे, स्थलांतरित मतदार यांची नावे वगळण्यात आली आहेत. घरोघर केलेली जनजागृती, हाऊसिंग सोसायट्या व महाविद्यालयात विशेष मोहिमा घेण्यात आल्या. त्यामुळे यंदा १८ ते २०या वयोगटातील नवमतदारांची संख्या वाढली आहे. चिंचवड मतदारसंघात ५ हजार ६३ नवमतदारांची नोंदणी झाली आहे. एकूण २१ हजार ७१६ जणांनी नोंदणी झाली आहे. भोसरी मतदारसंघात ८ हजार ८०८ मतदारांची संख्या वाढली आहे. त्यात २ हजार ५१९ हे १८ ते १९ वयोगटातील नवमतदार आहेत. पिंपरी मतदारसंघात एकूण ६ हजार मतदारांची नोंदणी वाढली आहे.

शहरातील मतदार संख्या

विधानसभा-पुरुष-महिला-तृतीयपंथी-एकूण

पिंपरी- १,९२,२०६-१,७२,५७२-२८- ३,६४,८०६

चिंचवड- ३,१६१५२-२,७९,२१५-४१-५,९५,४०८

भोसरी- २,९३,८०२-२,४१,७७२-९२-५,३५,६६६

एकूण- ८,०२,१६०-६,९३,५५९-१६१-१४,९५,८८०

चिंचवडमध्ये सर्वाधिक मतदान केंद्रे

चिंचवड विधानसभा मतदारसंघ राज्यातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकांचा मतदारसंघ आहे. येथे पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांपैकी सर्वाधिक ५ लाख ९५ हजार ४०८ मतदार तर ५१० मतदान केंद्रे आहेत. भोसरी मतदारसंघात एकूण ४६४, तर पिंपरी मतदारसंघात एकूण ३९९ केंद्रे आहेत.

Web Title: 36 thousand 622 new voters in Pimpri-Chinchwad; Highest number of voters in Chinchwad Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.