सर्वसामान्यांसाठी ३,६६४ घरे , केंद्र शासनाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 03:02 AM2017-11-30T03:02:06+5:302017-11-30T03:03:16+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चºहोली, रावेत आणि मोशीतील बोºहाडेवाडीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणा-या गृहप्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने बुधवारी

 3,664 houses for general public, central government approval | सर्वसामान्यांसाठी ३,६६४ घरे , केंद्र शासनाची मान्यता

सर्वसामान्यांसाठी ३,६६४ घरे , केंद्र शासनाची मान्यता

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चºहोली, रावेत आणि मोशीतील बोºहाडेवाडीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणा-या गृहप्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे योजनेची सुरुवात होणार आहे. चºहोली, रावेत आणि मोशीतील बोºहाडेवाडीमध्ये एकूण ३ हजार ६६४ घरे बांधण्यात येणार आहेत.
देशातील प्रत्येक नागरिकाला २०२२ पर्यंत घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाणार आहे. या योजनेंतर्गत घर नसणाºयांना घर दिले जाणार आहे. नागरिकांकडून अर्जही मागविण्यात आले. त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून किती जणांना घरे हवी आहेत, हे निश्चित केले जाणार आहे.
याबाबत स्थायी समिती सभापती सीमा सावळे म्हणाल्या, ‘‘राज्य सरकारच्या तांत्रिक समितीने चºहोली, रावेत आणि मोशीतील बोºहाडेवाडी येथे पहिल्या टप्प्यात एकूण ३ हजार ६६४ घरे बांधण्याच्या डीपीआरला १० नोव्हेंबरला मंजुरी दिली. त्यानंतर हा डीपीआर केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला होता.
केंद्र सरकारच्या तांत्रिक समितीने अवघ्या १९ दिवसांत महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या तीन प्रकल्पांना अंतिम मंजुरी दिली आहे. त्याबाबत केंद्राच्या संबंधित तांत्रिक समितीने बुधवारी महापालिकेला कळविले आहे.’’

शहरात १० ठिकाणे प्रस्तावित
महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागातील १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागातील १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार चºहोली येथे १४४२ (खर्च १५० कोटी ३२ लाख), रावेतमध्ये ९३४ (खर्च ९१ कोटी ६ लाख), डुडुळगावमध्ये ८९६, दिघीत ८४०, मोशीतील बोºहाडेवाडीमध्ये १२८८ ( खर्च १३५ कोटी ९० लाख), वडमुखवाडीत १४००, चिखलीमध्ये १४००, पिंपरीत ३००, पिंपरीतच आणखी २०० आणि आकुर्डीमध्ये ५०० घरे उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. योजनेचा डीपीआर करून आधी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला.

Web Title:  3,664 houses for general public, central government approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.