अर्थसंकल्पाला ४० टक्के कात्री?
By admin | Published: April 18, 2017 03:01 AM2017-04-18T03:01:41+5:302017-04-18T03:01:41+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंगळवारी सकाळी ११ला सादर करण्यात येणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंगळवारी सकाळी ११ला सादर करण्यात येणार आहे. जीएसटीमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेता अर्थसंकल्पात विकासकामांना ४० टक्के कात्री लावण्याचे धोरण आखले जात आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
महापालिकेचे अंदाजपत्रक फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातच सादर केले जाते. मात्र, यंदा महापालिकेची निवडणूक असल्यामुळे अंदाजपत्रक तयार असूनही स्थायी समितीला सादर करण्यास बराच विलंब झाला.
महापालिकेत प्रथमच भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. भाजपाचे हे पहिलेच अंदाजपत्रक आहे. त्यामुळे स्थायी समिती स्थापन होऊनही अर्थसंकल्पाबाबत सदस्यांनी अभ्यास करण्याचे काम सुरू केले होते. त्यामुळे भाजपाच्या पहिल्याच अंदाजपत्रकात काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. (प्रतिनिधी)