काळ्या बाजारात जाणारा ४२० पोती तांदूळ जप्त

By admin | Published: June 3, 2017 02:10 AM2017-06-03T02:10:27+5:302017-06-03T02:10:27+5:30

रेशनिंगचा शासकीय तांदूळ काळ्या बाजारात विकण्यासाठी जाणाऱ्या ट्रकवर तळेगाव पोलीस व मावळ पुरवठा निरीक्षक कार्यालयाकडून

420 bags of black goods seized in the market | काळ्या बाजारात जाणारा ४२० पोती तांदूळ जप्त

काळ्या बाजारात जाणारा ४२० पोती तांदूळ जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दाभाडे : रेशनिंगचा शासकीय तांदूळ काळ्या बाजारात विकण्यासाठी जाणाऱ्या ट्रकवर तळेगाव पोलीस व मावळ पुरवठा निरीक्षक कार्यालयाकडून केलेल्या संयुक्त कारवाईत २१ टन वजनाचा ४ लाख २० हजार रुपये किमतीचा ४२० पोती असलेला ट्रक मालासह जप्त करण्यात आला.
खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा येथे कारवाई केली. या कारवाईमुळे तांदळाचा काळाबाजार करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे़ ट्रकचालक सिराज हबीब सय्यद (वय २६, रा. गुलबर्गा राज्य कर्नाटक) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला वडगाव न्यायालयाने ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, (के ए ३२ बी ६८५०) या क्रमांकाच्या ट्रकमध्ये सोलापूर येथील शासकीय लेबल असलेला ४२० पोती तांदूळ आढळून आला. ताडपत्रीने झाकून चोरटी वाहतूक करण्यात येत होती. खोपोली (रायगड) येथे हा ट्रक जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक सुवेज हक व जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार रणजित देसाई, मावळ पुरवठा निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, हवालदार प्रकाश वाघमारे, सुभाष रूपनवर, नितीन साळुंके, जयराज पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शासकीय लेबल : स्वस्त धान्य दुकानातील माल

सोलापूर येथून तूर भरून खोपोली (रायगड) येथे जात असल्याचे ट्रकचालक सय्यद याने सांगितले. उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अधिकाऱ्यांचा संशय बळावला. पाहणी केली असता शासकीय लेबल असलेल्या तांदळाची पोती असल्याचे आढळले. हा तांदूळ स्वस्त धान्य दुकानाचा असल्याचे मावळ पुरवठा कार्यालय सूत्राकडून सांगण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर करत आहे. हा तांदूळ फूड कॉर्पोरेशन इंडिया (पंजाब) राज्याचा असून ट्रकवर संशय येणार नाही, अशी पॅकिंग करण्यात आली होती. अन्न सुरक्षा, अंत्योदय व बीपीएल चा हा तांदूळ असल्याचे मावळ पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

Web Title: 420 bags of black goods seized in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.