महिलेकडून ४८ लाख घेतले, पैसे मागितल्यावर तिच्यावरच बलात्कार करून दिली बदनामीची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 07:04 PM2023-02-04T19:04:36+5:302023-02-04T19:05:01+5:30

रावेत, चिंचवड परिसरात ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला...

48 lakhs was taken from the woman, when she asked for money, she was raped and threatened with defamation | महिलेकडून ४८ लाख घेतले, पैसे मागितल्यावर तिच्यावरच बलात्कार करून दिली बदनामीची धमकी

महिलेकडून ४८ लाख घेतले, पैसे मागितल्यावर तिच्यावरच बलात्कार करून दिली बदनामीची धमकी

Next

पिंपरी : एका दाम्पत्याने महिलेकडून ४८ लाख ४० हजार ६५९ रुपये घेतले. पैसे ठरलेल्या अटीवर परत न करता महिलेची फसवणूक केली. त्यानंतर आरोपी व्यक्तीने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार केला. रावेत, चिंचवड परिसरात ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.

पीडित ३४ वर्षीय महिलेने याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यावर चौकशी करून पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. अभिजित अरुण ताजणे (वय ३८), त्याची ३७ वर्षीय पत्नी (दोघे रा. ठाणे) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथे ऑक्टोबर २०२० मध्ये एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले. त्यामध्ये मेडिकल सुरू करण्यासाठी डिपॉझिट म्हणून आरोपींनी फिर्यादीकडून २० लाख रुपये घेतले. त्यानंतर हॉस्पिटलसाठी उसने म्हणून २८ लाख ४० हजार ६५९ रुपये घेतले. डिपॉझिटचे पैसे हॉस्पिटल सोडताना दिले जातील. तर हातउसने घेतलेले पैसे वर्षभरात दिले जातील, असे ठरले होते. पुढे काही दिवसांनी फिर्यादी यांनी मेडिकल सोडले असल्याने त्यांनी डिपॉझिट म्हणून दिलेल्या २० लाख रुपयांची मागणी केली. ते पैसे देण्यासाठी आरोपींनी टाळाटाळ केली.

मे २०२२ मध्ये आरोपीने फिर्यादींसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून त्यांना त्रास दिला. आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे न वागल्यास फिर्यादीचे अश्लील फोटो नातेवाइकांना दाखवून त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन आरोपीने फिर्यादीवर लैंगिक अत्याचार केला. फिर्यादीने पैशांची मागणी केली असता आरोपीने धमकी दिली. तुझे अश्लील फोटो आमच्याकडे आहेत. आम्ही ते तुझ्या नातेवाइकांमध्ये व मित्रांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊन तुझी बदनामी करू, अशी धमकी आरोपीने दिली. याबाबत फिर्यादी पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक प्राची तोडकर तपास करीत आहेत.

Web Title: 48 lakhs was taken from the woman, when she asked for money, she was raped and threatened with defamation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.