शहरात स्वाइन फ्लूची पाच जणांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 01:08 AM2018-10-04T01:08:29+5:302018-10-04T01:08:57+5:30

शहरामध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन रुग्णांची संख्या २१३ झाली आहे. स्वाइन फ्लूने आतापर्यंत २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन

5 people infected with swine flu in city | शहरात स्वाइन फ्लूची पाच जणांना लागण

शहरात स्वाइन फ्लूची पाच जणांना लागण

Next

पिंपरी : शहरामध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन रुग्णांची संख्या २१३ झाली आहे. स्वाइन फ्लूने आतापर्यंत २८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून स्वाइन फ्लूच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर मृतांची संख्या ही वाढत आहे. या जीवघेण्या आजाराची बुधवारी (दि. ०३) ५ रुग्णांना लागण झाली. त्यामुळे रुग्णांची संख्या २१३ झाली आहे.

संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याच्या संख्येमध्ये वाढच होताना दिसत आहे. पोषक वातावरणामुळे हा आजार बळावत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभागासह नागरिकांची चिंता वाढत आहे. तसेच स्वाइन फ्लूच्या विषाणूंपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक लस व टॅमी फ्लूच्या गोळ््या घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. खासगी रुग्णालयातही लसीची मागणी वाढली आहे.
 

Web Title: 5 people infected with swine flu in city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.