जनजागृतीसाठी ५२ हजार विद्यार्थी
By admin | Published: October 6, 2016 02:46 AM2016-10-06T02:46:29+5:302016-10-06T02:46:29+5:30
: शहरातील वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक जनजागृती करण्यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी, चतु:शृंगी, निगडी, हिंजवडी वाहतूक शाखेच्या अंतर्गत विविध शाळेतील सुमारे ५२ हजार विद्यार्थी
पिंपरी : शहरातील वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक जनजागृती करण्यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी, चतु:शृंगी, निगडी, हिंजवडी वाहतूक शाखेच्या अंतर्गत विविध शाळेतील सुमारे ५२ हजार विद्यार्थी वाहतूक जनजागृती करण्यासाठी सकाळी साडेनऊ वाजता रस्त्यावर दोन्ही बाजूने मानवी साखळी करून नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करणार आहेत़ वाहन चालविताना आपण सर्व जण संयम ठेवून व शिस्त पाळून आपल्या शहराची सांस्कृतिक ओळख जपू या, अशा आशयाचे पोस्टर्स आणि भित्तिपत्रक शहरभर लावण्यात आली आहेत़ झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर स्टॉप लाइनवर थांबा व पादचाऱ्याचा आदर करा़ लाल सिग्नलला थांबा, हॉर्नचा वापर टाळा, सिटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करा, रुग्णवाहिकेला प्राधान्याने रस्ता द्या, अशा नियमांचे पालन करण्यासाठी शहरातील विविध शाळांतील अनेक विद्यार्थी नागरिकांना आवाहन करणार आहेत़
वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे शहरात अनेक अपघात झाले आहेत़ नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ राज्यात पहिल्यांदाच मानवी साखळी करून पुण्यासह पिंपरी -चिंचवडमध्ये वाहतूक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी, समाजसेवक, पोलीस मित्र संघटना, नगरसेवक, व्यापारी, महापालिकेचे अधिकारी स्वयंस्फू र्तीने उपक्रमात सहभागी होणार आहेत़ सकाळी नऊ वाजता सर्व नागरिकांना नेमून दिलेल्या ठिकाणी एकत्रित येऊन स्टीकर्स आणि झेंड्याचे वाटप करण्यात येणार आहे़ त्यानंतर साडेनऊ वाजता वाहतूक जनजागृती मोहिमेबद्दल नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे़. (प्रतिनिधी)