निवडणुकीसाठी ५२० अर्ज दाखल
By admin | Published: February 3, 2017 04:16 AM2017-02-03T04:16:43+5:302017-02-03T04:16:43+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ४१६ असे एकूण ५२० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी दुपारी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी ४१६ असे एकूण ५२० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे. तसेच, याच वेळी उमेदवारांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी एबी फार्म भरावा लागणार आहे. त्यामुळे दुपारी तीननंतरच सर्वच पक्षांच्या उमेदवारी यादी जाहीर होणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. गेल्या शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे, बसपा, एमआयएम, आप आदी पक्षांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे उमेदवारीबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
बुधवारी ६४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे एकूण संख्या १०६ झाली होती. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या सातव्या दिवशी ४१६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये सर्वपक्षीय अर्ज आहेत. (प्रतिनिधी)