आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Published: May 29, 2017 02:49 AM2017-05-29T02:49:20+5:302017-05-29T02:49:20+5:30

उन्हाळी सुटीत अजमेरा कॉलनीत आजीकडे राहण्यास आलेल्या एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस

6-days police custody of accused | आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी

आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : उन्हाळी सुटीत अजमेरा कॉलनीत आजीकडे राहण्यास आलेल्या एकवीस वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील सातही आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात त्यांना हजर कले असता त्यांना एक जूनपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ रमेश शेट्टी (२६, सुखवाणी क्लासिक, मोरवाडी), नसीज अहंमद इन्सान अली खान (वय ३१, रा. प्रेमपार्क, अजमेरा कॉलनी), हर्षल देविदास भाटिया (वय २४, मासूळकर कॉलनी), गुरुजितसिंग दस्सार (वय २६, अजमेरा कॉलनी), दानिश मेहबूब चौधरी (वय २३, रा. द्वारकानगरी, कासारवाडी), सिद्धार्थ राजेंद्र झपके (वय १९, वास्तुउद्योग कॉलनी), प्रतीक राजेंद्र परळीकर (वय २७, मोरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शुक्रवारी सहा जण पोलिसांच्या हाती लागले. शनिवारी दुपारी प्रतीक याला पोलिसांनी जेरबंद केले.
अजमेरा कॉलनी येथे सुटीसाठी ही तरुणी आजीकडे आली होती. शेजारी राहत असलेल्या सौरभ शेट्टी या तरुणाशी ओळख झाली होती. हा तरुण तिला एक दिवस फिरायला घेऊन गेला. त्या वेळी त्याने तिच्यावर अत्याचार केले. ही गोष्ट त्याने त्याच्या तीन मित्रांनाही सांगितली. त्यानंतर त्या तिघांनीही तिच्यावर अत्याचार केले व तीन मित्रांच्या ओळखीच्या मित्रांनीही पीडितेवर अत्याचार केले होते. याप्रकरणी पीडित तरुणीने आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

Web Title: 6-days police custody of accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.