शहरात ६ लाखांचा दारूसाठा जप्त
By admin | Published: February 10, 2017 03:12 AM2017-02-10T03:12:48+5:302017-02-10T03:12:48+5:30
उत्पादनशुल्क विभागाने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे ५ लाख ९७ हजार ९९२
पिंपरी : उत्पादनशुल्क विभागाने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत आचारसंहिता लागू झाल्यापासून सुमारे ५ लाख ९७ हजार ९९२ रुपयांचा दारूसाठा जप्त केला. आतापर्यंत ४८ जणांवर आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले. ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. उत्पादनशुल्क विभागाकडून कारवाईची मोहीम सुरू असून, आचारसंहिता कक्ष अधिक सक्षमतेने कार्यरत झाला आहे.
राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने विविध ठिकाणचे दारूसाठे जप्त केले. २१ लिटर देशी दारू, ३१ लिटर विदेशी दारू, ४० लिटर ताडी अशा स्वरूपात मद्यसाठा जप्त
केला आहे. दारूनिर्मितीसाठी
लागणारे १२ हजार १४० लिटर रसायनसुद्धा जप्त करण्यात आले. १३ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाली. तेव्हापासून अद्यापपर्यंत विविध पोलीस ठाण्यांत ६९३ गुन्हे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)पिस्तूल विक्रीस आलेला सांगवीत जेरबंद
पिस्तूल विक्रीस आलेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि १० जिवंत काडतुसे असा ३५ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनुराग महन्थबहाद्दूर सिंग (वय २२, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अनुराग हा पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकात पिस्तूलविक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती फौजदार विलास पालांडे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले.