बनावट पीएफ खात्याद्वारे ६ लाख ५५ हजारांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2016 02:02 AM2016-10-12T02:02:44+5:302016-10-12T02:02:44+5:30

बनावट पीपीएफ खाते तयार करून, त्यावर कंपनीचे पैसे भरून ते स्वत:च्या फ ायद्यासाठी वापरून ६ लाख ५५ हजारांचा अपहार केल्याचा प्रकार

6 million 55 thousand pieces of embezzlement through fake PF account | बनावट पीएफ खात्याद्वारे ६ लाख ५५ हजारांचा अपहार

बनावट पीएफ खात्याद्वारे ६ लाख ५५ हजारांचा अपहार

Next

पिंपरी : बनावट पीपीएफ खाते तयार करून, त्यावर कंपनीचे पैसे भरून ते स्वत:च्या फ ायद्यासाठी वापरून ६ लाख ५५ हजारांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी मुकेश कुमारसिंग उर्फ शर्मा आणि संजयसिंग (दोघेही रा़ गया, बिहार) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना मार्च २०१३ ते १४ जून २०१६ दरम्यान मुळचंद मार्के ट पहिला मजला, गोकुळ हॉटेल शेजारी पिंपरी येथे घडली़ या प्रकरणी इसाक सत्तार सय्यद (वय ४६, रा़ शेवाळे सेंटर, पिंपरी) यांनी तक्रार दाखल केली आहे़
फिर्यादी सय्यद यांची सक्सेस एंटरप्रायजेस सिक्युरिटी एजन्सी आहे़ आरोपी मुकेश आणि संजयसिंग हे कंपनीत नोकरीस होते़ त्यांनी बनावट पीपीएफ खाते तयार के ले़ त्या खात्यावर कंपनीचे पैसे भरून परस्पर स्वत:च्या फ ायद्यासाठी ६ लाख ५५ हजार रुपये काढले़ ही रक्कम काढून आरोपींनी अपहार केला़ ही माहिती समजल्यानंतर सय्यद यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फि र्याद दाखल केली़ अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत़
विवाहितेस विषारी पावडरचे पाणी पाजून मारण्याचा प्रयत्न
पत्नीस दोन वेळेस विषारी पावडर पाण्यात मिसळून पाजून आणि इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून जिन्याच्या पॅसेजमधून खाली ढकलून देऊन जिवे मारण्याची घटना घडली़ या प्रकरणी आरोपी चंद्रकांत भीमराव कांबळे (पती), भीमराव एकनाथ कांबळे (सासरा, रा़ देहूगाव), भागीरथी कांबळे, रवींद्र कांबळे, बाळासाहेब कांबळे यांच्या विरोधात निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ याविषयी सुनीता कांबळे (वय ३६, रा़ मोरेवस्ती, चिखली) यांनी फि र्याद दाखल केली आहे़ ही घटना डिसेंबर २००८ ते सप्टेंबर २०१६ या दरम्यान देहूगाव रुपीनगर यशदा एम्बीयन्स म्हेत्रेवस्ती चिखली येथे घडली़
संगीता आणि चंद्रकांत यांचे २००६ साली लग्न झाले आहे़ सासरी नांदत असताना डिसेंबर २००८ ते सप्टेंबर २०१६ या दरम्यान पती चंद्रकांत, सासू भागीरथी, सासरा भीमराव, आणि दीर यांनी आपापसांत संगनमत करून संगीतास त्रास दिला़ तसेच तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला़ तिच्या पतीने जानेवारी २०१६ मध्ये जबरदस्तीने विषारी पावडर पाण्यात मिसळून पाजली़ तसेच एप्रिल २०१६ मध्येही विषारी पावडर पाण्यात मिसळून संगीतास पाजून राहत असलेल्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून जिन्याच्या पॅसेजमधून खाली ढकलून दिले़ निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ आरोपी चंद्रकांत याला अटक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 6 million 55 thousand pieces of embezzlement through fake PF account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.