पिंपरीतील रॉयल रेसिडेन्सीच्या लिफ्टमध्ये ७ जण अडकले; अग्निशमन दलाकडून १ तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुटका
By नारायण बडगुजर | Published: March 17, 2024 12:50 PM2024-03-17T12:50:25+5:302024-03-17T12:50:45+5:30
रॉयल रेसिडेन्सीच्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये सात जण अडकले होते
पिंपरी : मोरवाडी पिंपरी येथील रॉयल रेसिडेन्सी मधील लिफ्ट मधील सात जणांची सुटका केली. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर सात जणांची सुटका करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री घडली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने माहितीनुसार, रॉयल रेसिडेन्सी, मोरवाडीत आहे. तेथील हणमंत गुब्याड यांनी अग्निशामक दलाच्या पथकाला माहिती दिली. रात्री ९ वाजता फोन केला. त्यांनतर पथक दाखल झाले. त्यावेळी तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये सात जण अडकले होते. त्यात फयाज (१० वर्ष, कुदळवाडी), अंबादास हांडे (६२ वर्ष, जुन्नर ), वसंत सातपुते (५७वर्ष, संगमनेर ), महादेव सातपुते (६० वर्ष, पुणे ), सोन्या सातपुते (५७वर्ष,संगमनेर), जगन्नाथ सातपुते(५४वर्ष, संगमनेर), दिलीप भालके (५७ वर्ष, मोशी) यांचा समावेश होता. त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलवले. तो पर्यंत येथे गर्दी वाढली होती. सर्वांची सुखरूप सुटका केली. पावणेदहाला सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. बचाव पथकात विठ्ठल सपकाळ, अमोल चिपळूणकर, चंद्रकांत चव्हाण, विकास कुटे, महेश इंदलकर, दिपेश दिवेकर, योगेश ढोले यांचा समावेश होता.