पिंपरी-चिंचवडचे ८८ उमेदवार अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 02:33 AM2017-11-11T02:33:52+5:302017-11-11T02:33:55+5:30
महापालिकेचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब न देणा-या ९९ उमेदवारांना नोटीस बजावली होती
पिंपरी : महापालिकेचा निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून मुदतीत निवडणूक खर्चाचा हिशेब न देणाºया ९९ उमेदवारांना नोटीस बजावली होती. त्यावर सुनावणी होऊन ८८ जणांना तीन वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचे आदेश विभागीय आयुक्त चंद्रकात दळवी यांनी दिले आहेत.
महापालिका निवडणुकीचा निकाल २३ फेब्रुवारीला जाहीर झाला. निवडणूक आयोगाच्या निवडणूक नियमावलीनुसार उमेदवारांनी एक महिन्यांच्या आत खर्च देणे आवश्यक असते. त्यानुसार २५ मार्चपर्यंत
हिशेब खर्च देणे आवश्यक असते. या संदर्भात महापालिकेच्या निवडणूक विभागाने ९९ उमेदवारांनी खर्च न
सादर केल्याबद्दल विभागीय आयुक्तांना कळविले होते. नोटीस बजावूनही हिशेब न दिल्याने ८८ जणांना निवडणूकीसाठी अपात्र ठरविले. विभागीय आयुक्तांनी ८ नोव्हेंबरला आदेश दिले. यात माजी नगरसेवक व अपक्ष उमेदवारांचा देखील समावेश आहे.