दंड वसुलीतून ९ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:52 AM2017-08-01T03:52:18+5:302017-08-01T03:52:18+5:30
लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यांत तब्बल ९२५ वाहनांवर कारवाई करत ३ लाख २९ हजार ४०० रुपयांची दंड वसुली केली.
लोणावळा : लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यांत तब्बल ९२५ वाहनांवर कारवाई करत ३ लाख २९ हजार ४०० रुपयांची दंड वसुली केली. यामध्ये विना हेल्मेट वाहने चालविणाºयांची संख्या सर्वांधिक आहे. तब्बल २८७ दुचाकी चालकांवर कारवाई करत १ लाख ४४ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणाºया ४६ वाहनांवर कारवाई करत ५० हजार दंड वसुली, विना परवाना वाहन चालविणाºया ३९ वाहनांवर कारवाई करत २० हजार ४०० रुपये दंड, ट्रिपल सिट वाहने चालविणाºया १७७ वाहनांवर कारवाई करत ३६ हजार २०० रुपये दंड, परवाना जवळ न बाळगणे १२५ वाहनांवर कारवाई व २५ हजार ४०० रुपये दंड, मोबाईल वर बोलत वाहन चालविणारे ११ जणांवर कारवाई करत २२०० रुपये दंड,
फॅन्सी नंबर प्लेट असणाºया १६ वाहनांवर कारवाई व ४ हजार ७०० रुपये दंड, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणाºया १८४ वाहनांवर कारवाई करत ४५ हजार ७०० रुपये दंड तर दारू पिऊन वाहन चालविणाºया तब्बल ४० जणांवर खटले दाखल करण्यात आले.
लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश माने, अनंत रावण, सुनील मुळे, पोलीस नाईक सामिल प्रकाश, जीवन गवारी, पोलीस मदतनिस दर्शन गुरव, सतीश ओव्हाळ, अंकुश गायखे, प्रकाश मराठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लोणावळा शहर हे पर्यटनाचे ठिकाण आहे. राज्य भरातून तसेच परराज्यांतून या ठिकाणी पर्यटक येत असतात. त्यांनी शहरात आल्यानंतर वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे तसेच वाहतूक शिस्त पाळावी असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.