९९७ कुटुंबांकडे नाहीत शौचालये
By admin | Published: October 15, 2016 05:54 AM2016-10-15T05:54:24+5:302016-10-15T05:54:24+5:30
डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत बावडा गाव हे १०० टक्के शौचालययुक्त केले जाईल. अद्याप गावात ९९७ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. या सर्व कुटुंबांकडे शौचालय
बावडा : डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत बावडा गाव हे १०० टक्के शौचालययुक्त केले जाईल. अद्याप गावात ९९७ कुटुंबांकडे शौचालये नाहीत. या सर्व कुटुंबांकडे शौचालय बांधण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच, यासाठी महिलांचा पुढाकार महत्त्वाचा आहे, तरच हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
बावडा ग्रामसचिवालयात आयोजित ग्रामस्थ, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्यापासूनच शौचालय बांधकामाच्या नियोजनासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकारी कामाला लागतील.
या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. यशवंत शितोळे, इंदापूर पंचायत समिती सभापती विलासराव वाघमोडे, प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, श्रीमंत ढोले यांनी शौचालय बांधण्यासाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. शौचालये बांधण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता असल्याचे पाटील यांनी सांगितले.
या वेळी उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, अमरसिंह पाटील, उपसभापती नारायण वीर, किरण पाटील, विकास पाटील,
महादेव घाडगे, धैर्यशील पाटील, सुधीर पाटील, देवराज जाधव, शिवाजी सावंत, उमेश सूर्यवंशी, संतोष पाटील, शंकर घोगरे, सुरेश घोगरे, अमोल घोगरे, वसंत शेंडगे, अंकुश घाडगे, संतोष सूर्यवंशी, अतुल टिळेकर, सुभाष आवारे, भगवान पांढरे, लक्ष्मण घोगरे आदी उपस्थित होते. अॅड. अमरसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले. अमर निलाखे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रामविकास अधिकारी शिंदे यांनी आभार मानले.