Pune| मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय विद्यार्थ्याने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 02:48 PM2022-12-26T14:48:25+5:302022-12-26T14:49:05+5:30

मुलाच्या आईच्या फिर्यादीनंतर मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल...

A 15-year-old student ended his life after suffering from the headmaster | Pune| मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय विद्यार्थ्याने संपविले जीवन

Pune| मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय विद्यार्थ्याने संपविले जीवन

Next

पिंपरी : मुख्याध्यापकाच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. भोसरी येथील गव्हाणे वस्ती परिसरात १० ते १३ डिसेंबरच्या दरम्यान हा प्रकार घडला. मयत १५ वर्षीय मुलाच्या ३७ वर्षीय आईने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, हितेश शर्मा (वय ४०, रा.गव्हाणे वस्ती भोसरी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश शर्मा हे मुख्याध्यापक आहेत. फिर्यादी यांच्या मुलाला शर्मा हे शाळेत मारहाण करत होते, शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण करत नाही, रस्टीकेट करतो, शाळेत पाठवू नका, असा फिर्यादींच्या मुलाला शारीरिक व मानसिक त्रास दिला. याच दबावातून मुलाने राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यानंतर, या प्रकरणी तपास करून हितेश शर्मा याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: A 15-year-old student ended his life after suffering from the headmaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.