बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितली अन् अडकला; सहाय्यक उद्यान निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 09:36 PM2023-06-07T21:36:20+5:302023-06-07T21:37:00+5:30

सहाय्यक उद्यान निरीक्षक किरण मांजरे यांना १७ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

A bribe was demanded and ensnared to pass the bill; Assistant Park Inspector in ACB network | बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितली अन् अडकला; सहाय्यक उद्यान निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितली अन् अडकला; सहाय्यक उद्यान निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

googlenewsNext

पिंपरी : ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी महापालिकेच्या सहाय्यक उद्यान निरीक्षकाने १७ हजारांची लाच घेतली. लाच घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सहाय्यक उद्यान निरीक्षकास रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (दि. ७) नेहरूनगर येथील उद्यान विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. किरण अर्जुन मांजरे (वय ४६) असे रंगेहात पकडलेल्या सहाय्यक उद्यान निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कंत्राटदार आहेत त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागामध्ये उद्यान देखभालीचे काम घेतले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी सहाय्यक उद्यान निरीक्षक मांजरे यांनी १७ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने बुधवारी दुपारी नेहरूनगर येथील उद्यान विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. सहाय्यक उद्यान निरीक्षक मांजरे यांना १७ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस अंमलदार सुनील सुरडकर, सौरभ महाशब्दे, पांडुरंग माळी यांच्या पथकाने केली.

Web Title: A bribe was demanded and ensnared to pass the bill; Assistant Park Inspector in ACB network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.