इंद्रायणीच्या काठावर दारू भट्टी; गुन्हे शाखेचा छापा; तब्बल १० लाखांचा मुद्देमाल जप्त

By प्रकाश गायकर | Published: July 7, 2023 08:48 PM2023-07-07T20:48:28+5:302023-07-07T20:48:47+5:30

दारू तयार करण्यासाठी २० हजार लिटर कच्चे रसायन, ७१० लिटर तयार हातभट्टी दारू जवळ बाळगली होती

A distillery on the banks of the Indrayani Crime Branch Raid Around 10 lakh worth of goods seized | इंद्रायणीच्या काठावर दारू भट्टी; गुन्हे शाखेचा छापा; तब्बल १० लाखांचा मुद्देमाल जप्त

इंद्रायणीच्या काठावर दारू भट्टी; गुन्हे शाखेचा छापा; तब्बल १० लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext

पिंपरी : आळंदीपोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंबळी गावात इंद्रायणी नदीच्या कडेला लावलेल्या एका हातभट्टी दारू भट्टीवर गुन्हे शाखा युनिट तीनने छापा टाकून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी १० लाख ७१ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ६) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली.

गणेश मन्नावर, दया चौधरी (दोघे रा. मोशी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार महेश भालचिम यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी चिंबळी गावात इंद्रायणी नदीच्या काठावर दारू भट्टी लावली. दारू तयार करण्यासाठी २० हजार लिटर कच्चे रसायन, ७१० लिटर तयार हातभट्टी दारू जवळ बाळगली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई करत १० लाख ७१ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.

Web Title: A distillery on the banks of the Indrayani Crime Branch Raid Around 10 lakh worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.