Pune Crime| घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 19:09 IST2022-08-16T19:09:11+5:302022-08-16T19:09:41+5:30
फिर्यादी गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात...

Pune Crime| घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
पिंपरी : घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यातून गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात देखील करण्यात आला. ही घटना काळेवाडी, ताथवडे, वाकड़, जुनी सांगवी येथे नोव्हेंबर २०२१ ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत घडली.
या प्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी शैलेश दिपक पवळे (वय २४, रा. पोलिस लाईन बिल्डिंग, वाकड) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख मॅॅट्रीमोनीयल साईटवरून झाली. फिर्यादी या घटस्फोटित आहेत हे माहिती असून देखील आरोपींनी त्यांना लग्नाचे आमिष दाखवून काळेवाडी, ताथवडे, वाकड आणि जुनी सांगवी परिसरातील हॉटलेमध्ये त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवले. फिर्यादी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने पोटदुखीची गोळी म्हणून गर्भपाताची गोळी खाण्यास देऊन जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.