चिखलीत गॅस सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 08:08 AM2024-04-25T08:08:16+5:302024-04-25T08:09:15+5:30
अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवित नागरिकांना सुरक्षित स्थळी नेले....
पिंपरी : चिखली येथे सिल्व्हर जीमच्या जवळील घरात बुधवारी (दि.२४) गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवित नागरिकांना सुरक्षित स्थळी नेले.
महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास चिखली येथील सिल्व्हर जीमच्या जवळील लेबर कॅम्पमध्ये आग लागल्याची वर्दी मिळाली. वर्दी मिळताच अग्निशामक चिखली, मोशी आणि पिंपरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या.
आगीचा भडका उडाला होता. आगीवर नियंत्रण मिळवित अग्निशमनच्या दलाच्या जवानांनी सिलेंडरच्या टाक्यातील गॅस काढून टाक्या निकामी केल्या. येथील मजूर घरगुती गॅस ऐवजी कमर्शियल गॅसच्या टाक्या स्वयंपाकासाठी वापरत होते. त्यातील एका टाकीचा स्फोट झाल्याने आग लागल्याचे अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.